इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू
उल्हासनगर कॅम्प ३ मधील दुर्घटना
ठाणे : उल्हासनगर येथे दवाखान्याचे छत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मेमसाब दवाखान्याचे छत कोसळून ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प नं. ३ येथील मेमसाब दवाखान्याच्या पहिल्या मजल्यावर काम सुरू असताना छत कोसळले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांपैकी २ महिला तर १ एका पुरूषाचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावपथके दाखल झाली आहेत. छताखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. छत कसे कोसळले याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...