`धर्मवीर`सिनेमा आणि 13 मे नेमका योगयोग काय?
धर्मवीर हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होतोय. पण 13 हीच तारीख का ?असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.
ठाणे: 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या नावाचा सिनेमा येतोय; अशी चर्चा जेव्हा पासून सुरु झाली तेव्हापासून या सिनेमाची चर्चा प्रत्येक नाक्या नक्यावर होऊ लागली. पोस्टर, टीझर आणि ट्रेलर रिलीझ होताच सिनेमा बाबतची उत्कंटा अधिकच ताणली गेली. अखेर धर्मवीर हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पण 13 हीच तारीख का? असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. तशी चर्चा सुद्धा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
सोशल मीडियावर सध्या एका फोटोची जोरदार चर्चा आहे. तो फोटो आहे प्रसाद ओक यांचा. तुम्ही म्हणाल या फोटोत काय विशेष आहे. प्रसाद ओक शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या व्यक्तिरेखेत उभे आहेत. उभी राहण्याची स्टाईल सुद्धा आनंद दिघे यांच्या सारखीच आहे. मात्र या फोटोत एक आर्माडा गाडी आहे. याच कंपनीची गाडी आनंद दिघे वापरत असत. महत्त्वाचं म्हणजे गाडीचा नंबर 'महाराष्ट्र 05 जी 2013' असा आहे. हाच नंबर आनंद दिघे यांच्या गाडीचा होता.
सोशल मीडियावर सध्या जो मेसेज व्हायरल होतोय त्या नुसार, 2013 हा आनंद दिघे यांचा आवडता नंबर होता. 13 हा आवडता शुभ अंक होता. त्यातच साहेबांवर आधारित सिनेमा 13 तारखेला प्रदर्शित होत असल्यानं हा एक योगायोग असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. महत्त्वाचं सांगायचं तर आतापेक्षा पूर्वी ठाणे जिल्ह्याचा विस्तार मोठा होता. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद दिघे यांना स्वखर्चाने एक आर्माडा गाडी दिली होती.