कपिल राऊत, ठाणे :  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी होम क्वारंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून जितेंद्र आव्हाड त्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी घरी सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंब्रा पोलीस स्टेशनमधील अधिकारी नाशिकमध्ये गेल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ३३ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचे सँम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकार आणि अन्य लोकही आले होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघात पाहणीसाठी गेले होते. मुंब्रा, कळवा भागात फिरताना हा अधिकारीही संपर्कात आला होता. त्यामुळे आव्हाड यांनी कोरोनाची टेस्ट करून घेत घरीच सेल्फ क्वारंटाईन केले आहे. आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारी म्हणून १४ दिवसांसाठी त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.


 



दरम्यान, मुंब्रा पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत. तर त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे रिपोर्ट अजून प्राप्त झालेले नाहीत.