विरार : विरारचा अर्नाळा समुद्र किनारा. एक डॉल्फिन इथे मृत अवस्थेत पडलेला. त्याला दुसऱ्या भटक्या कुत्र्याने पाहिलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याने चक्क समुद्र किनारी त्या मृत डॉल्फिनवर अशा प्रकारे अंत्यसंस्कार केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत डॉल्फिन मासा समुद्रातुन वाहून समुद्र किनारी असलेल्या रेतीत अडकला. त्याचा मृतदेह किनाऱ्याला लागल्यापासून अनेक नागरिकांच्या निदर्शनास आला. पण, त्याकडे कुणी लक्ष दिले नाही.


समुद्र किनारी असलेला एक भटका श्वान त्याच्या आजूबाजूला फिरत होता. त्या माशाची काहीच हालचाल होत नसल्याने अखेर त्या श्वानाने डॉल्फिनच्या मृतदेहावर वाळू टाकून त्याला जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला. 



बराच वेळ हा श्वान त्या डॉल्फिनच्या आजूबाजूची वाळू त्यावर टाकत होता. बऱ्याच वेळानंतर त्या श्वानाला यश मिळाले आणि त्याने टाकलेल्या रेतीमध्ये डॉल्फिनचा मृतदेह झाकोळून गेला.


समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या नागरिकांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. मात्र, जे या श्वानाला जमलं ते माणुसकीला जमलं नाही. एका श्वानाने आपल्या कृतीतून माणूस जातीला चांगलीच चपराक दिल्याचे या घटनेवरून दिसून आलं.