Bhandara News :  अंगणात खेळता खेळता कुटंबियांच्या डोळ्यासमोर  2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. भंडारा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुरडीच्या मृत्यूला अंगणात असलेली पाण्याची टाकी कारणीभूत ठरली आहे. पालकांनी मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे ही घटना घडली आहे. त्रिषा अरविंद मिसार असे मृत मुलीचे नाव आहे. अरविंद मिसार यांचे स्थानिक मांढळ येथे राहते घर आहे. घरासमोरील नळाच्या टाकीत पडून एका त्रिषाचा मृत्यू झाला आहे. 


परिसरात नळ योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने त्रिषाचे वडिल अरविंद यांनी जमिनीत टाकी तयार केली आहे. टाकी सिमेंट काँक्रीटची असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. मृतक बालिका त्रिशा घरासमोरील अंगणात खेळत होती. खेळता


खेळता ती जवळपास ३ फूट पाणी असलेल्या नळाच्या टाक्यात पडली. 


ही घटना परिसरातील नागरिकांसह कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्रिशाला पाहण्याबाहेर काढले. त्रिशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.


बादलीत पडून एका 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू


बादलीत पडून एका 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. थेरकावच्या समता कॉलनी परिसरात ही घटना घडली होती. मोहम्मद पठाण असं मृत बालकाचं नाव आहे. आई-वडील झोपले असताना बाथरुममध्ये बादलीतील पाण्यात खेळताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यानं भरलेल्या बादलीत पडला. यात या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. 


पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू  चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू


नाशिकच्या चांदवडमध्ये 4 वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला होता. नवीन बांधकामाच्या उघड्या टाकीत डोकावत असताना तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला होता.


गरम पाणी अंगावर पडल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू


गरम पाणी अंगावर पडल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक शहरात हिरावाडी परिसरात घडली होती. कार्तिक अनिल शेखरे असे या मुलाचे नाव आहे. आंघोळीसाठी करण्यात आलेल्या गरम पाण्याची बादली बाथरूम ठेवण्यात आली होती. त्यावेळी कार्तिक खेळत खेळत या बादलीजवळ गेला होता. तिथे गरम पाण्याची बादली अंगावर पडल्यानं तो 35 टक्के भाजला होता. पोटाला पाठीला गरम पाण्याची चटके बसल्याने  त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आलं . मात्र उपचार करत असतानाच त्याचा मृत्यू झाला.