दारूची तल्लफ लईई... वाईट! दारू नाही भेटली म्हणून थेट सॅनिटायझरची पार्टी; मग घडलं असं
लॉकडाऊनमुळे तळीरामांची अडचण होत आहे. काहीजण नशेसाठी दारूच्या ऐवजी सॅनिटायझरचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.
यवतमाळ : दारूची तल्लफ लागली म्हणून लोकं काय करतील त्याचा भरवसा नाही. राज्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे तळीरामांची पंचाईत होत आहे. परंतु यवतमाळच्या वणीमध्ये दारू भेटली नाही म्हणून सॅनिटायझर पिऊन सात जणांचा वेगवेगळ्या ठिकणी मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. यामुळे दारूची दुकानं बंद आहेत. काही ठिकाणी दारूची साठेबाजी करणारे चढ्या दराने दारू विकत आहेत. अशातच तळीरामांची अडचण होत आहे. काहीजण नशेसाठी दारूच्या ऐवजी सॅनिटायझरचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.
दारू भेटत नाही म्हणून शहरातील काही तरुणांनी थेट सॅनिटायझर पार्टीचा बेत आखला. दारूसमोर सॅनिटायझरचा नशा काहीच नाही अशा अविर्भावात 6-7 जणांनी मनसोक्त सॅनिटायझर प्राशन केलं.
काही वेळाने त्यांना मळमळ उलट्या होऊ लागल्या. कुटूंबियांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवस आधी शहरात दोघांचा सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला होता.