Yavatmal Honey Bees Attack News : कुणी कल्पनाही करु शकत नाही अशा प्रकारच विघ्न यवतमाळमधील (Yavatmal) एका लग्न सोहळ्यात (wedding ceremony )आले. मंडपात जेवणाच्या पंगती बसल्या असताना अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला (Honey Bees Attack). यामुळे वऱ्हाडींना भरल्या ताटावरुन उठावे लागले. यात 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णलायात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेव येथे लग्नसोहळ्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. मधमाशांनी लग्न वऱ्हाडावर हल्ला चढवला. अनेकांना चावा घेतल्याने एकच धावपळ उडाली. यात 50 हुन अधिक वऱ्हाडी मंडळी जखमी झाले आहेत. गावातील मंदिरात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न लागल्यानंतर वधू वरांकडील पाहुणे मंडळी जेवणाला पंगतीत बसले होते. यावेळी अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढविला. 


आग्यामोहोळ मधील माशांनी चावा घेतल्यामुळे वेदनेने वर वधूसह दोन्हीकडील पाहुण्यांची एकच पळापळ झाली. बचावासाठी काहींनी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या. मात्र, दोन लहान मुलांसह अनेक महिला मधमाशांच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.


अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला


लोकप्रिय अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला होता. 14 मार्च 2023 रोजी सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु महामार्गावर झाडांचं पुनर्रोपण करत होते यावेळी च्यावर मधमाशांनी हल्ला केला.झाडांची पुनर्रोपण सुरु असताना त्या झाडांवर स्थित असलेल्या मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अनेक लोकांवर त्यांनी हल्ला केला. मधमाश्यांच्या अचानक हल्ल्यानं तिथं खूपच गोंधळ उडाला. मधमाश्या सयाजी शिंदे यांच्या डोळ्यावर आणि मानेला चावल्या. 


मधमाशाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू


मधमाशाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. अर्धा तास मधमाशा महिलेच्या शरिराचे लचके तोडत होत्या. या महिलेच्या मृतदेहाची इतकी भयानक अवस्था झाली की पोलिसांना या महिलेचा मृतदेह पहावला नाही. उत्तर प्रदेशात ही घटना घडली. 
लाल रंगामुळे मधमाशा चिडतात


छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा, वेरूळ लेणी पाहायला जात असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, लेण्यांमध्ये उग्र वासाचे परफ्यूम मारून जाऊ नका. मिथिलिन क्लोराइड, फेरॉन यांचा वापर केलेले उग्र वासाचे परफ्यूम आणि लाल रंगामुळे मधमाशा हल्ला करण्याची शक्यता आहे. लाल रंगामुळे मधमाशा चिडतात, त्यामुळे लेण्यांपासून एक किलोमीटर परिसरात येणे टाळावे, असे तज्ज्ञांचं मत आहे. तसंच मधमाशांच्या मोहळापासून सावध राहावे, असे आवाहन भारतीय पुरातत्त्व विभागाने पर्यटकांना केले आहे.