नागपूर : नागपूरच्या सावनेरमधून धक्कादायक घटना समोर आली असून लॉजवर प्रेयसीसोबत शरीरसंबध ठेवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेयसी सोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेयसी सोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू  


अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉजमध्ये आपल्या प्रेयसी सोबत आला होता.


दोघेही आत गेल्यानंतर थोड्यावेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला.


घाबरलेल्या प्रेयसीने त्याच्या मित्रांना बोलावले, त्यांनी पोलिसांना सूचना दिली. 


मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या मिळाल्या असून त्याच्या अति सेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज  आहे..