नागपूर : मुसळधार पावसामुळे नागपूर शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना झाल्या. काल रात्रीपासून संततधार पावसाने नागपुरात हजेरी लावली मात्र आज सकाळी 8 वाजल्यापासून पावसाचा जोर अचानक वाढलायं. त्यामुळे केवळ सखल परिसरच नाही तर सर्वच भागात पाणी सचल्याचे चित्र आहे. नागपूरच्या अयोध्या नगर, माणेवाडा, नंदनवन, राजीव नगर, बॅनर्जी ले आउट, ओंकार नगर, कन्नमवार नगर, सीताबर्डी, झाशी राणी चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.


वाहतुकीवर परिणाम 


चौका चौकात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून ठीक ठिकाणी ट्राफिक जाम बघायला मिळत आहे. खराब वातावरणच परिणाम हवाई वाहतुकीवर देखील झाल्याने नागपुरात येणारी विमान उड्डाणे इतरत्र डायव्हर्ट करण्यात आली आहे... पुढील 48 तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.