Maharashtra News : परभणीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पती पत्नीचा वाद विकोपाला पोहोचला. याच वादातून दाम्पत्याने विहरित उडू मारून आत्महत्या केली. यामुळ त्यांची दोन लहाम मुल पोरकी झाली आहेत. पती पत्नीच्या वादामुळे मुलांचे भविष्य अंधारात गेले आहे. असं विचित्र वागताना लेकरांचा विचार मनात आला नाही का? असा प्रश्व येथे उपस्थित केला जात आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीतील पालम पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.  ज्योती सुधाकर केडाळे ( वय 27 वर्षे) आणि सुधाकर रंगनाथ केडाळे (वय 29 वर्षे) अशी मृत दांमपत्याची नावे आहेत.  दोघेही शेताकडे निघाले असता त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका  विकोपाला पोहोचला की रागाच्या भरात पती सुधाकर याने विहरित उडी घेतली, त्यानंतर पत्नी ज्योती हिने देखील त्यांच्या पाठोपाठ त्याच विहिरीत उडी मारली.


यात पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  त्यांना दोन वर्षाची मुलगी आणि सहा महिन्याचा मुलगा आहे. आई वडिलांच्या रागामुळे ही लहानगी मुलं पोरकी झाली आहेत, पती-पत्नीच्या आत्महत्येने नाव्हा गावावर शोक कळा पसरलीये, या घटनेचा तपास पालम पोलिस करीत आहेत.


घरकुलाचे धनादेश न मिळाल्याने कुटंबाचा आत्महत्येचा प्रयत्न


चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परीषद चिमूर क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (बेगडे ) येथील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले आहे. त्या सर्वांनी कर्ज काढुन सज्जा स्तरापर्यंत बांधकाम केले. मात्र, योजनेनुसार टप्प्याटप्प्याने अपेक्षित असणारे अनुदानाचे धनादेश मिळाले नसल्याने लाभार्थी विंवचनेत आहेत. यामुळे आलेल्या नैराश्याने सुधाकर सुर्यभान नन्नावरे (वय 40 वर्षा)  या लाभार्थ्यांने गावच्या रस्त्याजवळ पिकावर फवारणीचे औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव (बेगडे ) येथील 92 लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम जवळची जमा पुंजी लावुन तर अनेकांनी कर्ज घेऊन सुरू केले. घराचे निम्मे काम झाले. मात्र, अनुदान आलेच नाही. पीडित सुधाकर नन्नावरे आज चिमूर नगर परिषदेत यासाठी पुन्हा गेला होता. मात्र, नकार ऐकावा लागल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यावर त्याला तातडीने चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरकुलाचा निधी कधी मिळेल असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.