अमरावती : ब्रिटिश काळात जे 124 ( a ) हे कलम लागू हेते. पण, या कलमात आता केंद्र सरकार बदल करणार आहे. संसदेत जेव्हा या कायद्याचे विधेयक येईल त्यावेळी मी त्यावर नक्की बोलणार आहे. या नव्या कायद्याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करत आहे. या कायद्यात प्रथमच बदल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे जुने ब्रिटिश कायदे आहेत ते रद्द करण्याचे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) हेच करू शकतात. तर, इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची हुकूमशाही चालू आहे. पण, त्यांच्या हुकूमशाहीला आम्ही घाबरणारे नाही. आम्ही त्यांच्या विरोधाचे लढू असा इशारा खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी दिला.


उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) सरकारने हनुमानाचे नाव घेतल्याने आमच्यावर देशद्रोहाची कलमे लावण्यात आली. 23 तारखेला संसदेच्या प्रीव्हीलेज कमिटीसमोर ( Privilege Committee ) मी हजर रहाणार आहे. या कमिटीसमोर आपले मत मांडताना कोणत्याही सदस्याला खोटे बोलणार नाही याची शपथ घ्यावी लागते. 


प्रीव्हीलेज कमिटीसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त यांची काय भूमिका होती हे मी सांगणार आहे. आमच्याबाबत जे जे काही घडलं ते आम्ही सर्व सांगणार आहोत, असे त्यांनी सांगितले.


लीलावती हॉस्पिटल हे जुने हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतानाचे फोटो व्हायरल करण्यात आले. एकाद्या रुग्णाचे ते ही महिला रुग्णाचे चेक अप होत असताना असे फोटो काढणे किती योग्य आहे असा सवाल खा. नवनीत राणा यांनी केला. 


उद्धव ठाकरे हे सत्तेच्या खुर्चीसाठी काहीही करू शकतात याचा मला अनुभव आला आहे. तसेच, ज्या स्वतः नर्स होत्या त्या डॉक्टरांना प्रश्न विचारत होत्या. ते पाहनू मला हसायला येते असा टोला त्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव न घेता लगावला.