नागपूर : तिने मर्सिडीजने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; स्वत: पोलीस स्टेशनला गेली अन्...
Nagpur Accident News : नागपुरात भरधाव कारने धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पार्टी करुन परतत असताना भरधाव कारने या दोन तरुणांना उडवले होते. त्यानंतर या महिलांनी स्वतः पोलीस ठाण्यात जात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात एका महिलेने भरधाव वेगाने कार चालवत दोन तरुणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपुरात रामझुल्यावर भरधाव वेगाने कार चालवत महिलेने दोन तरुणांचा मृत्यू बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या तरुणाने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. तहसील पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी मध्यरात्री सुमारास राम झुल्यावरून जात असताना भरधाव मर्सिडीजने मोपेडला धडक दिल्याने हा अपघात घडला. मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मो. आतिफ, मो जिया असं मृतक तरुणाचे नाव आहे. तर माधुरी सारडा, रितिका मालू असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रामझुला मेयो उतारावरील कर्व्ह मेट्रो खांबाजवळ मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या मोहंमद हुसैन गुलाम मुस्तफा आणि त्याचा मित्र मोहंमद आतीफ मोहंमद जिया यांना मागून येणाऱ्या मर्सिडीज कारने जबर धडक दिली. मोहंमद हुसैन गुलाम मुस्तफा हा त्याच्या मित्रासोबत दुचाकी वाहन क्र. एमएच.37-क्यू.2948 वरून जाफरनगरहून मोमीनपुराच्या दिशेने जात होते. त्याचवेळई रामझुला येथे मागून भरधाव वेगात आलेली मर्सिडीज कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की हुसेन आणि अतिक हे दुचाकीसह लांबपर्यंत फरफटत गेले.
या अपघातात हुसेन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर अतिकही गंभीर जखमी झाला. त्यानंतर मर्सिडीज चालविणाऱ्या महिलेने काही अंतरावर गाडी थांबवली. काही वेळातच लोकांची गर्दी जमू लागली. लोकांचा संताप पाहून दोन्ही महिलांनी तिथून पळ काढला. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी पोलिसांना याची दिली. त्यानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच हुसेनला मृत घोषित केले. तर अतिकला रात्री उशिरा ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी कारमधील दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही वेळाने दोन्ही महिलांनी तहसील पोलीस ठाणे गाठले आणि रितूने सांगितले की ती गाडी चालवत होती. पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, रितू आणि माधुरी शनिवारी रात्री सीपी क्लबमधल्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तिथून परतत असताना रामझुला येथे तिचे कारवरील नियंत्रण सुटले. दरम्यान, कार चालवणारी महिला दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी रितूच्या रक्ताचे नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवले.