नागपूर: प्रत्येक वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भाच्या विकासाच्या मुद्दयावर नव्याने चर्चा केली जाते. मात्र, तरीही उपराजधानीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. नागपूर औद्योगिकीकरणात नेहमीच मागे राहिले. त्यामुळे येथील तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे धाव घ्यावी लागते. कापसाच्या उत्पादनासाठी विदर्भ ओळखला जातो. या आशेवर विदर्भात अनेक गिरणी उद्योग आले. मात्र, कालांतराने हे उद्योग बंद पडले. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्त्पन्नावर परिणाम झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारण्यांकडून नेहमीच नागपूरच्या विकासाचा मुद्दा आला की, मिहान प्रकल्पाचा उल्लेख केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या विकासात 'मिहान प्रकल्प' महत्वपूर्ण ठरेल असे सांगितले जाते.


मात्र,अजूनही मिहान मध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही मोठे उद्योग सुरु झालेले नाहीत.  2016 मध्ये पतंजली उद्योगाची घोषणा झाली. मात्र, त्याच्या कामाचा अजूनही सुरुवात झालेली नाही.  मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत नागपूर जिल्ह्यात ७४ सामंजस्य करार झालेत.


मात्र, या लघू आणि मायक्रो उद्योगांमधून फक्त 1018 जणांना रोजगार मिळाला. याशिवाय, शहरातील वाढती गुन्हेगारी हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. त्यामुळे फक्त चर्चा न करता विदर्भात विकासाची पहाट प्रत्यक्षात कधी उगवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.