आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : परिस्थिती कशीही असली तरी  जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येथे. चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) एका तरुणीने हे खंर करुन दाखवलं आहे.  शेतमजुराची लेक  सरकारी अधिकारी झाली आहे. बापाच्या कष्टाचं या तरुणीने चीज केलं आहे. गावची लेक अधिकारी झाल्यांनतर गावाने तिचे धूमधडाक्यात स्वागत केले.  चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील शालु शामराव घरत ही तरुणी उद्योग निरीक्षक बनली आहे (Success Story).
चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरवानी गावातील अत्यल्प भुधारक शेतमजुराची मुलगी अधिकारी झाली. या  मुलीनं गावाचं नाव मोठं केल आहे.  तिच्या यशानंतर गावाने तिची ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. फुलांचा वर्षाव केला. गावातील महिलांनी तिचे औक्षण केले. गावानं केलेलं भव्य दिव्य स्वागत बघून ती भावनिक झाली. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयोगाच्या परीक्षेत यशस्वी कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावात राहणाऱ्या शालु शामराव घरत एका शेतमजुराची मुलगी आहे.  प्रतिकूल परिस्थितीत तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात तिचा प्रथम क्रमांक मिळवला आहे. आता ती उद्योग निरीक्षक पद भुषविणार आहे. 


जिल्हा परीषद शाळेत झाले शिक्षण


शालु हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळत झाले आहे.  शाळा, कनिष्ठ महाविद्यालय पूर्ण करून विज्ञानातील पदवी (बिएस्सी) चे शिक्षण तिने नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातुन पूर्ण केले. सध्या तिचे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण सुरु आहे. 


शिक्षण घेत अलतानाच ती  स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती.  ब्राईटएज फाऊन्डेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्ती करीता शालुची निवड करण्यात आली. या शिष्यवृत्तीमधुन दरमहा आर्थिक मदत तीला मिळत होती. ज्यामुळे तिला पुणे सारख्या शहरात विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. शालुने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे. अभ्यासात सातत्य आणि नियोजन असले तर यश नक्की मिळते, असे ती म्हणाली.