Video | मुंबई रस्ते दुरुस्तीत 12 हजार कोटींचा घोटाळा! काँग्रेस नेते मिलिंद देवरांकडून CBI चौकशीची मागणी; शिवसेनेच्या अडचणी वाढणार?
रस्ते दुरूस्तीच्या नावाखाली मुंबईला गेल्या 5 वर्षात कोणी लुटलं याची सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केलीय. 2017 ते 2022 मध्ये केवळ मुंबईतल्या रस्त्यांवर 12 हजार कोटी रूपये खर्च झाले असा दावा माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय. याशिवाय खड्डे बुजवण्यासाठी आणि कोल्डमिक्ससाठी अतिरिक्त 45 कोटी रूपये दरवर्षी खर्च करण्यात आले असा आरोप त्यांनी केलाय.