Video | संभाजीनगरमध्ये अडीच कोटीचा कुत्रा घोटाळा
Tue, 23 Aug 2022-8:05 pm,
2.5 crore dog scam in Aurangabad
भटके कुत्रे हा संभाजीनगर महापालिकेच्या डोक्याला ताप झालाय... धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय.. अशी पालिकेची बिकट अवस्था... कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारता येत नाही... त्यामुळं नसबंदी करून कुत्र्यांची संख्या आटोक्यात राखण्याचा प्रयत्न महापालिका करते... मात्र २०१६ पासून गेल्या सहा वर्षांत कुत्र्यांच्या नसबंदीवर किती खर्च झाला, याची आकडेवारी पाहिली तर धक्का बसल्याशिवाय राहत नाही...
2015-16 मध्ये 672 कुत्र्यांच्या नसबंदीवर 4 लाख 20 हजार रुपये खर्च झाले
2016-17 मध्ये 307 कुत्र्यांसाठी 1 लाख 91 हजार रुपये,
2017-18 मध्ये 95 कुत्र्यांसाठी 67 हजार रुपये,
2018-19 मध्ये 3440 कुत्र्यांवर 30 लाख 96 हजार रुपये,
2019-20 मध्ये 4534 कुत्र्यांवर 43 लाख 7 हजार 300 रुपये,
2020-21 मध्ये 10681 कुत्र्यांवर 1 कोटी 1 लाख रुपये,
तर 2021-22 मध्ये 8824 कुत्र्यांवर 83 लाख रुपये
असे आतापर्यंत एकूण 2 कोटी 66 लाख रुपये नसबंदीवर खर्च झाले, अशी आकडेवारी माहिती अधिकारात समोर आलीय