नेवासे, अहमदनगर । वारी : पहिले पालखी रिंगण पार पडले
Tue, 25 Jun 2019-12:05 pm,
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर देहूहून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत निवृत्तीनाथ यांचीही पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे. तर नेवासे येथे पहिले पालखी रिंगण झाले. वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.