Video| `उद्धव ठाकरे यांनी धोका दिलाय; धोका देणारे यशस्वी होत नाही` अमित शाह यांची टीका
Mon, 05 Sep 2022-2:20 pm,
Amit Shah criticizes Uddhav Thackeray
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला. जो राजकारणात धोका देतो त्याचं राजकारण यशस्वी होत नाही असं अमित शाह म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी विचारधारेशी घात केला, त्यांनी विश्वासघात केला हे बोलण्यात संकोच करू नका असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांची मुंबईत भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.