Video| मुख्यमंत्र्यांच्या दरेगावात `केबल स्टेड पूल`; एकनाथ शिंदे यांचे गाव होतंय अपडेट
Thu, 18 Aug 2022-12:15 pm,
Cable stead bridge will be constructed in Daregaon of Chief Minister
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज कसा असणार आहे याचा थ्रीडी व्हिडिओ झी 24 तासकडे आहे...मुख्यमंत्र्यांच्या दरेगावात मोठ्या पुलाचं काम लवकरच सुरू होणार आहे...दरेगाव आणि कांदाटी खो-याला जोडणारा हा पूल असेल...सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा पुल बांधला जाणार आहे...महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिरे असा केबल स्टेड पुल असणार आहे...महत्त्वाचे म्हणजे या पुलावरच पर्यटकांसाठी 43 मीटर उंचीवर व्हीव्हींग गॅलरी असणार आहे...त्यामुळे कोयना जलाशय त्याच बरोबर जंगल भाग असलेल्या कांदाटी खोऱ्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता येणार आहे...या पुलाचा अंदाजे खर्च 175 कोटी रुपये असणार आहे...मात्र यामुळे दुर्गम असे सोळशी खोरे आणि कांदाटी खोरे जोडले जाणार आहे.