मुंबई । राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना `ईडी`ची नोटीस
Sat, 01 Jun 2019-6:20 pm,
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या ६ जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील (Aviation deal) दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.