पणजी । गोवा भाजपात मतभेद टोकाला, अमित शाह यांच्यावर संताप

Sat, 20 Oct 2018-7:45 pm,

गोवा भाजपात मतभेद इतके टोकाला गेलेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत पदाधिकऱ्यांची मजल गेली आहे. सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेस आमदारांना भाजपात घेणं पक्षातील एका गटाला पटलेलं नाहीये. त्यामुळे नाराजीचे तीव्र पडसाद पक्षात उमटताहेत. गोव्यात करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं म्हणण्याची पाळी भाजपा पक्षश्रेष्ठींवर आलीय. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे आमदार गळाला लावले खरे, मात्र त्यामुळे पक्षातंर्गत नाराजीने टोक गाठलंय, इतकं की अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांची मजल गेलीय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link