कल्याण । लाचखोर अधिकारी सुनील जोशीवर केडीएमसी मेहरबान

Wed, 26 Sep 2018-11:15 pm,

कल्याण-डोंबिवली महापालिकेत माकडाच्या हाती कोलीत दिल्याचा प्रकार समोर आलाय. दोन वेळा लाच प्रकरणात अटक झालेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याकडे चक्क अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण - डोंबिवलीकरांनी कपाळावर हात मारून घेतलाय. लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा उपायुक्त सुनील जोशी याच्याकडे पालिका प्रशासनानं महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवून कायद्यासह नैतिकतेचेही धिंडवडे काढले आहेत. सुनील जोशी याच्याकडे अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आलीये. त्यामुळे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्याचा कारनामा केडीएमसीनं केलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link