मुंबई । मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा

Sat, 27 Oct 2018-6:45 pm,

मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेली १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत पाळली नाही तर २० नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच २१ तारखेपासून संपूर्ण राज्यभरात गनिमी काव्यानं आंदोलन करून सरकारला जेरीस आणण्याचा इशाराही मुंबईतील आयोजित बैठकीत देण्यात आला. दरम्यान,मराठा समाज आरक्षण जाहीर झाले नाही तर मुख्यमंत्रीच नव्हे तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा आक्रमक इशारा यावेळी मराठा मोर्चा समन्वयकांनी दिलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link