मुंबई । मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती
Thu, 12 Sep 2019-11:25 am,
मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत छोट्यांचाही मोठा सहभाग दिसून येतोय. नटूनथटून चिमुरडी मुलं सहभागी झाली आहेत. मुंबई गणपती विसर्जनात परदेशी नागरिकांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती नुकतीच झाली असून त्याच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे.