नाशिक । मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने महेश मांजरेकर नाराज
Thu, 03 Jan 2019-9:45 pm,
आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.