मुंबई । परतीच्या पावसाला सुरूवात, 6,7 ऑक्टोबरला सतर्कतेचा इशारा
Wed, 03 Oct 2018-7:55 pm,
मुंबई : राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. उत्तरेकडून दक्षिणेकडे परतीचा पाऊस जात असतो. त्यामुळं जळगाव, गोंदीया या राज्याच्या उत्तरेकडील भागातून पाऊस परतत असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय. दरम्यान, समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यानं ६ आणि ७ ऑक्टोबरला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.