मुंबई । बंडखोर आमदारांना भेटण्यास मज्जाव : शिवकुमार यांचा हॉटेलबाहेर ठिय्या
Wed, 10 Jul 2019-1:10 pm,
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.