मुंबई । कोरोना व्हायरस : शेअर बाजार पडला, ५ लाख कोटींचे नुकसान
Fri, 28 Feb 2020-5:15 pm,
चीनला कोरोना व्हायरसने बेजार केले आहे. आज गुंतवणूकदारांना सळो की पळो करून सोडले. कोरोना व्हायरसने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरला तर निफ्टीत ४३१ अंकांची घसरण झाली. आजच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे जवळपास ५ लाख कोटींची नुकसान झाले.