मुंबई : राफेल प्रकरणामुळे देशाच्या मनात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कितीही बाजू घेतली तरी काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेनं कुठेही अजून वेगळी भूमिका घेतलेली नाही. प्रकरण प्राथमिक अवस्थेत आहे. JPC ची मागणी झालीय. शिवसेनेनं कुणाला क्लीनचिट दिलेली नाही, असे राऊत म्हणालेत. दरम्यान, गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी आहे, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link