नालासोपारा । एका टँकर माफियानं गणेशभक्ताला चिरडले, नागरिकांचा रास्तारोको

Thu, 13 Sep 2018-10:05 pm,

नालासोपाऱ्यात एका टँकर माफियानं गणेशभक्ताला चिरडलंय. गणेशमूर्ती घेऊन जात असताना पाठिमागून आलेल्या टँकरनं चिरडल्यामुळे कमलेश बिंद या युवा गणेशभक्ताचा मृत्यू झाला. नालासोपाऱ्यातील पूर्व धणीवबाग तलावाजवळ दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. तसंच अनेक गाड्यांची तोडफोडही केली. त्यामुळे धणीवबाग तलाव परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link