मुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल
Mon, 23 Dec 2019-5:40 pm,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.