ठाणे । इंधन बचत करणारी नवी चारचाकी रिक्षा क्यूट
Thu, 25 Jul 2019-11:40 pm,
नवी चारचाकी रिक्षा क्यूट ठाण्यात धावू लागलीय..बजाज कंपनीनं ही क्यूट भारतीय बाजारात आणलीय. वजनानं हलकी आणि आकाराने लहान असणारी ही क्यूट इंधन बचत करणारी आहे. एक लीटर पेट्रोलमध्ये ही क्यूट ३५ किलोमीटर धावते. जास्तीत जास्त ७० वेगमर्यादा असणाऱ्या या वाहनाची इंजिन क्षमता २१६सीसी आहे. वाहनाचे इंजिन मागील बाजूस आणि सामान ठेवण्याची जागा वाहनाच्या पुढच्या बाजूला आहे. ठाणेकरांना ही नवी क्यूट आवडलीय.