नवी दिल्ली | भाजप बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली
Wed, 12 Dec 2018-10:10 pm,
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. ताब्यात असलेली तिन्ही राज्य काँग्रेसच्या 'हाता'ला लागलीत. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय. भाजपचा राज्यांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व राज्यांतील भाजप प्रदेशाध्यांची बैठक बोलविली आहे. ही बैठक दिल्लीतील भाजप मुख्यालयात दुपारी २ वाजता होणार आहे.