कॅनडा । प्रसिद्ध नायगरा धबधबा गोठला । पाहा विहंगम दृष्य
Thu, 24 Jan 2019-10:05 pm,
कॅनडातला प्रसिद्ध धबधबा नायगरा फॉल गोठला आहे. हे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची पावलं कॅनडाकडे वळू लागली आहेत. गोठलेल्या नायगरा धबधब्याचे सुंदर दृश्यं डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कॅनडामध्ये नायगरा धबधबा वाहतो त्या ठिकाणाचे नाव ओंटारिओ. सध्या ओंटारिओमध्ये उणे २५ ते ४० अंश तापमान आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी खाली जाईल आणि धबधबा आणखी गोठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.