Video| पनवेल - कर्जत दुसऱ्या रेल्वे लाईनला केंद्राचा हिरवा कंदील
Tue, 23 Aug 2022-7:45 pm,
Panvel Karjat Second Line Will Start Early
रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर... कर्जत ते सीएसएमटी प्रवास २५ ते ३० मिनिटं कमी होण्याची शक्यता आहे. पनवेल कर्जत मार्गावर लवकरच दुसरी लाईन सुरू होणार आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवाही सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पनवेल ते कर्जत दरम्यानच्या वन विभागाच्या जमिनीवर दुसरी लाईन टाकण्यास केंद्राने परवानगी दिलीय. 2025 पर्यंत दुसरी लाईन बांधून पूर्ण होईल. त्यामुळे कर्जत पनवेलमार्गे नवी मुंबईशी लोकलसेवेने जोडलं जाईल. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी हा मार्ग अतिशय उपयुक्त ठरेल. पनवेल एअरपोर्टमुळे सध्या पनवेल आणि परिसराचा विकास झपाट्याने होतोय. या मार्गाच्या बांधणीमुळे 1800 झाडं कापावी लागणार आहेत.