रोखठोक । उमेदवार ठरवतांना पक्षांची कसोटी?
Fri, 29 Mar 2019-9:20 pm,
राज्यात बहुतेक जागांवर आघाडी आणि युतीचे उमेदवार ठरले असले तरी काही जागांवर गोंधळ सुरुच आहे. पुण्यात काँग्रेसला अजून उमेदवार शोधता आलेला नाही तर तिकडे जळगावमध्ये भाजपमधील संभाव्य बंडखोरीमुळं उमेदवार स्मिता वाघ यांनी अर्ज भरला असला तरी त्या अर्जासोबत एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळं स्मिता वाघ यांचा अर्ज कायम राहणार की उमेदवार बदलणार याबाबत चर्चा सुरु आहे. तर रावेरमध्ये अगदी अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीची जागा जागावाटपात काँग्रेसला दिली गेली आहे. त्याबदल्यात आता राष्ट्रवादी आता कोणती जागा घेते ते पाहावं लागणार आहे. मुंबईची सर्वात चर्चेत असलेली उत्तर पूर्व मतदारसंघातल्या जागेवर भाजपला उमेदवार ठरवतांना शिवसेनेच्या विरोधामुळं भाजपाची कोंडी होतेय. तिथं सध्या किरीट सोमय्या खासदार आहेत. याच विषयावर आज चर्चा करुयात खास रोखठोक कार्यक्रमात... उमेदवार ठरवतांना पक्षांची कसोटी?