रोखठोक । बेस्ट संप मिटला पण संकट कामय?
Wed, 16 Jan 2019-11:25 pm,
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज (बुधवारी) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मागे घेण्यात आला. कामगार नेते शशांक राव यांनी दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयात संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी बेस्ट संपाला पाठींबा दिलेल्या सर्वांचे तसेच उच्च न्यायालयाचे विशेष आभार मानले. आपला लढा यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मात्र, संकट कायम आहे.