मुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी
Sat, 04 May 2019-7:50 pm,
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.