मुंबई । लोकमंगलचा `अमंगल` कारभार, ५ कोटींचे अनुदान लाटले
Fri, 23 Nov 2018-9:05 pm,
लोकमंगल संस्थेचा बोगस कारभार उजेडात आलाय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ५ कोटी रुपये मिळवलेत, असल्याचे उघड झालेय. लोकमंगल शुगर इथेनॉल अॅण्ड को.जन. इंडस्ट्रीज लिमिटेड ही सुभाष देशमुख यांची संस्था आहे. २५ कोटीचा निधी देण्यासाठी प्रस्ताव दिला. मात्र, ५ कोटी रुपये निधी मिळाला. बनावट कागदपत्राच्याद्वारे ५ कोटीचे अनुदान लाटले. त्यानंतर सुभाष देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.