मुंबई । सातव्या वेतन आयोगाचा कोणाला मिळणार लाभ?
Thu, 27 Dec 2018-10:00 pm,
राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सातवा वेतन आयोगाबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालावर आज मंत्रिमंडळाने निर्णय घेत तो लागू करण्याचा निर्णय घेतला. हा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.