Video| साताऱ्याच्या सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचं अपहरण

Tue, 30 Aug 2022-11:00 am,

Student Kidnap In Satara Sainik School सातारा सैनिक स्कूलमधील 11 वर्षीय मुलाचं अज्ञातानं अपहरण केलंय. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर ही घटना घडली असल्याचं समोर आलंय. सहावीमध्ये शिकत असलेला हा विद्यार्थी 28 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. मित्रासोबत साता-यात फिरायला गेला होता. त्यावेळी तो बेपत्ता झाला. शोधूनही तो सापडत नसल्यानं त्याच्या मित्राने सैनिक स्कूलमध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link