नवी दिल्ली । `आधार`बाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे तीन निर्णय
Wed, 26 Sep 2018-10:20 pm,
नवी दिल्ली : 'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. बँक खाते उघडणे, मोबाईल नंबर मिळविण्यासाठी, शाळा प्रवेश यासाठी आता आधार नंबर गरजेचा नाही. मात्र, पॅन कार्ड तसेच आयकर परताव्यासाठी आधार गरजेचे असणार आहे. अनेक गोष्टींसाठी आधारची सक्ती गरजेची नसली तर आधार घटनात्मरित्या योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्य न्यायलयाने दिला आहे. आधारमुळं नागरिकांच्या घटनात्मक अधिकाराचं उल्लघन होत असल्याच्या आशयाच्या ३१ याचिकांवर सर्वोच्य न्यायलयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. आधार घटनात्मकदृष्टा वैध असून आधार कायद्यामुळं नागरिकांच्या गोपनियतेच्या अधिकाराचं कुठल्याही प्रकारे उल्लंघन होत नसल्याचं घटनापीठातील पाच पैकी तीन न्यायमूर्तींच्या निकालात स्पष्ट करण्यात आलं.