Video | ठाण्यात दहीहंडीसाठी 2 कोटीची बक्षीसं! कोण चाखणार 2 कोटीचं लोणी

Thu, 18 Aug 2022-6:10 pm,

Thane Dahi Handi Almost 2 Crore Prizes To Be Distributed दहा थरांच्या विश्वविक्रमास 21 लाख, 9 थरांसाठी 11 लाख, 8 थरांसाठी 11 लाख, 8 थरांसाठी 51 हजार अशी लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमांची चढाओढ ठाणे शहरात पुन्हा सरू झालीय. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना निर्बंधांमुळे आणि त्या अगोदर दहीहंडीवरील न्यायालयीन प्रक्रियेमुळे उत्सवातील लाख मोलाच्या बक्षिसांची घागर उताणी झाली होती. परंतु यंदा होणारी महापालिका निवडणूक आणि दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधांतून मुक्त झाल्यामुळे ठाण्यातील आयोजकांकडून लाखोंच्या दहिहंड्या उभारण्यात आल्याय. गोविंदांसाठी दोन कोटीहून अधिक रकमेचे लोणी उपलब्ध करुन दिलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link