ठाणे । शहरात काही भागात पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार
Thu, 06 Dec 2018-11:30 pm,
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.