Video | राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे निवृत्ती वेतन थकवले
Fri, 26 Aug 2022-9:25 am,
The state government has exhausted the pension of Rs 10 thousand crores of the employee
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. सरकारनं रक्कम जमाच केली नसल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय. राज्य सरकारी कर्मचा-यांच्या निवृत्तिवेतन योजनेचे पैसे ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ मध्ये हस्तांतरित करणं बंधनकारक होतं. मात्र राज्य सरकारनं 10 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम थकवली. ही रक्कम सरकारनं तातडीने हस्तांतरित करावी, अन्यथा सरकारवरील बोजा वाढत जाईल, असा सल्ला नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी राज्य सरकारला दिलाय. राज्य सरकारनं नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचा-यांसाठी नवीन निवृत्तिवेतन योजना जाहीर केली होती. त्यानुसार कर्मचा-यांनी 10 टक्के तर सरकारनं 14 टक्के रक्कम एनएसडीएलमध्ये जमा करणं आवश्यक होतं. पण 31 मार्च 2021 अखेर राज्य शासनानं सरकारी कर्मचा-यांच्या वाटयाची 10 हजार 642 कोटींची रक्कमच हस्तांतरित केली नाही. हा अहवाल मार्च 2022 मध्ये तयार करण्यात आला. तोपर्यंत 2021 अखेरची रक्कम थकविण्यात आली होती. गेल्या वर्षभरात ही रक्कम वाढली की भरली त्याची स्पष्टता या अहवालात नाही.