Video | परशुराम घाटातील वाहतूक 24 तास राहणार सुरु... कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी महत्त्वाची बातमी
Thu, 25 Aug 2022-10:35 am,
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांना आनंदाची बातमी.. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक आजपासून 24तास सुरु राहणार आहे. घाटात धोकादायक परिस्थितीमुळे रात्री सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. आता पावसाचा जोर कमी झाला असून, दरडी कोसळण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमान्यांचे परशुराम घाटातून आगमन होणार आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत आजपासून परशुराम घाटातील वाहतूक २४ तास सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान दरड प्रवण क्षेत्रात अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध असणार आहेत.