Video| हळदीचं पेटंट भारतालाच! बलाढ्य अमेरिकेला कायदेशी लढ्यात भारतानं हारवलं
Tue, 23 Aug 2022-8:55 pm,
Turmeric patent belongs to India; India defeated America in legal battle
हळदीच्या पेटंटबाबतचा कायदेशीर लढा भारताने जिंकलाय. २५ वर्षांपासून सुरू असलेला चिवट संघर्ष फळाला आला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे. जखमा ब-या करण्याच्या हळदीच्या औषधी गुणधर्मावर आधारित हा लढा होता. अमेरिकेने हे पेटंट घेतल्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्याला आव्हान दिलं. सीएसआयआरने त्यासाठी तब्बल 32 संदर्भ शोधून काढले. हे सर्व संदर्भ संस्कृत, हिंदी, उर्दूमधले होते. यातले काही संदर्भ 100वर्षे जुने होते.