पुणे: नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असल्याची कबुली कळसकरने दिली होती. याच पार्श्वभूमीवर दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे कळसकरचा ताबा सोपवण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळसकरचा ताबा मिळवण्यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरु होते. कळसकरचा ताबा मिळवल्यानंतर सीबीआयला कळसकर आणि अंदुरे या दोघांना समोरासमोर ठेवून चौकशी करता येणार होती. मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत सीबीआयला कळसकरचा ताबा मिळवता आला नव्हता. अखेर मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी कळसकरला सीबीआय कोठडी सुनावली. त्यामुळे सचिन अंदुरे आणि कळसकर या दोघांची सीबीआयला एकत्रित चौकशी करता येणार आहे.  


दुसरीकडे श्रीकांत पांगारकरची ६ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.