पुणे:  पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला असून आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जाईल. 
 
बारामतीत नुकतीच गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुणे ग्रामीण पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.