पुणे: सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने दोन वर्षांच्या मुलाला ठार मारून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जान्हवी अमित कांबळे असे या महिलेचे नाव आहे. जान्हवी हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमित कांबळे यांच्या पत्नी होत्या. मगरपट्टा चौकातील सुंदरसंकुल सोसायटीत हा प्रकार घडला. ही घटना रात्री बारा ते पहाटे पाच दरम्यान राहत्या घरी घडली. यावेळी कांबळे नाईट शिफ्टला कामावर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीने आपला दोन वर्षांचा मुलगा शिवांश याच्या तोंडावर उशी दाबून त्याला मारून टाकले. यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघड झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यावेळी पोलिसांना जान्हवीने लिहलेली चिठ्ठी मिळाली. यात त्यांनी म्हटले होते की, ‘अमित तू माझ्यावर प्रेम करतो, पण मला वेळ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. सासू सुजाता ही माझा छळ करते'. 


यानंतर जान्हवीच्या आई-वडिलांनी तिच्या सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. अमित कांबळे हा लाडका जावई असल्याने त्यांच्या विरोधात महिलेच्या जान्हवीच्या आई-वडिलांनी कुठलीही तक्रार केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.